Search
Close this search box.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गो-तस्करी करणारे वाहन देवरी पोलिसांच्या ताब्यात, 5 लाख 78 हजाराचा मुद्देमाल जप्त

गोंदिया : अवैधरित्या गोवंशाची तस्करी करणार्‍या महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप वाहनाला देवरी पोलिसांनी रोखून गोवंशासह एकूण ५ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त केले आहे. ही घटना १ एप्रिल २०२५ पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास देवरी पासून ५ किमी अंतरावर असलेल्या ग्राम डवकीटोला गावाजवळ घडली.
१ एप्रिल रोजी डवकीटोला रस्त्यावरून येणार्‍या महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप वाहनांमध्ये एकूण १३ गोवंश अमानुषरित्या कोंबून येत असल्याची माहिती पेट्रोलिंग दरम्यान असलेल्या गोपनीय देवरी पोलिसांना प्राप्त मिळाली. माहिती मिळताच पोलीस स्टाफसह तातडीने सापळा रचून आपल्या चमूकडून पाळत ठेवली व स्थानिक डवकीटोला गावाजवळ नाकाबंदी करून पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनाला (एम.एच.४० बी.जी. ४२५६)थांबवून चौकशी केली असता, त्यात एकूण १३ गोवंश जनावरे सापडले. मात्र वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. देवरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून एकूण ५ लाख ७८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पशुवैद्यकीय अधिकारी देवरी यांचेकडून वैद्यकीय परीक्षण केले. त्यांना सुरक्षेकामी गौ शाळा येथे दाखल करण्यात आले. दोरीने बांधून वाहनात कोणतेही चारापाण्याची वैद्यकीय सुविधा न देता त्यांना क्रूर वागणूक देऊन त्यांना निर्दयपणे कोंबून भरलेल्या वाहन चालकावर कलम ११(१)(ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० सहकलम ५ (अ) ९, महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा १९७६ अनन्वे गुन्हा नोंद केला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण डांगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा हवींद्र बडोले, पोना. समरीत, मपोसी.निखारे,सैनिक ढवळे, सैनिक हटवार, सैनिक राऊत यांनी केली आहे.

Rajendra Singh
Author: Rajendra Singh

Leave a Comment

और पढ़ें