तांत्रिक मान्यता न घेता काढली निविदा
जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यसैलीवर आक्षेप
गोंदिया (ता- 25) जिल्ह्यातील मामा तलाव पुनर्जीवन (सर्वकस) योजनेअंतर्गत जवळपास चारशे ते पाचशे कामांच्या निविदा काढून त्यांचे कार्यारंभ आदेश ही निर्गमित करण्यात आले. परंतु या कामांसाठी आवश्यक असणारी तांत्रिक विभागाकडून मान्यता न घेतल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.सदर निवेदेचा घोळ जलसंधारण अधिकारी यांच्या देखरेखीखाली झाला असल्याने त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उभा ठाकला आहे.
वर्ष 2023-24 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मामा तलावांची सर्वकस योजनेतून पुनर्जीवन व दुरुस्ती करण्याचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले. सदर कामे याच महीन्यात युद्ध स्तरावर सुरूही करण्यात आले. यासाठी जवळपास दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचे अपेक्षित अंदाजपत्रकही सदर करण्यात आले.सदर कामे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत अधिक सक्षम करण्यासाठी या कामांची तांत्रिक विभागाकडून मान्यता घेणे आवश्यक होते. परंतु जिल्हा जलसंधारण अधिकारी राऊत यांनी तांत्रिक विभागाकडून कोणतीही मान्यता न घेता सर्व कामांची निविदा मंजूर करीत सर्व कामांना कार्यारंभ आदेश निर्गमित केल्याची चर्चा आहे.सदर कामासंदर्भात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला सुद्धा विचारात न घेतल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळातून व्यक्त होत आहे. सदर कामे करताना कोणतीही दुर्घटना घडल्यास या कामांची देखरेख करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर कमा संदर्भात अधिक महिती काढली असता जिल्यातील ऐका वर्तमान राजकिय नेत्याच्या वरदहस्ताखाली सदर कामे कार्यान्वित होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तरीपण वरील कामाची चौकशी करून तांत्रिक मान्यता न घेणाऱ्या जलसंधारण अधिकाऱ्यावर कारवाई होईल का? असा प्रश्न जिल्हा परिषद वर्तुळातून ऐकु येत आहे.
